![]() |
| Maharashtra News: सरकारी कागदपत्रावर आईच्या नावाचे समावेश असणे अनिवार्य, जाणून घ्या संपूर्ण माहिती |
Maharashtra News
Maharashtra News: महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) सोमवार ११ मार्च २०२४ रोजी घोषित केले कि, आता सर्व सरकारी कागदपत्रावर आईच्या नावाचे समावेश असणे हे बंधनकारक आहे. यामध्ये समावेश असलेले महत्वाचे कागदपत्रे, जन्म दाखला, शाळेतील कागदपत्रे जसे कि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि इतर. त्यानंतर प्रापर्टी संबंधित कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर सरकारी कागदपत्रे. हा निर्णय आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे २०२४ पासून होणार आहे.
२०१८ मध्ये आयकर विभागाने (Income Tax Department) या बाबतीत सादरीकरण देताना स्पष्ट केले कि, अर्जदाराची आई हे एकल पालक असेल तर त्यांचा पॅन कार्डच्या अर्जामध्ये वडिलाचे नाव असणे हे अनिवार्य असणार नाही. त्यानंतर सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) यांनीसुद्धा नियमात सुधारणा केली. अर्जदाराला आई एकल पालक आहे कि नाही आणि अर्जदाराला अर्ज करता वेळेस फक्त आईचे नाव सांगायचे आहे कि नाही याबद्दल पर्याय उपलब्ध करून दिला.
Maharashtra cabinet has decided that the name of the mother will be mandatory on all govt documents like Birth certificates, School documents, property documents, Aadhar cards, and PAN cards. The decision is to be implemented from 1st May 2024.
— ANI (@ANI) March 11, 2024
Read Also: Digital School Of Tech Burner: बघा एका भारतीय Youtuber च्या Digital School ची सुरुवात....
