![]() |
| Chandrapur Fire: चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरामधील A to Z बाजार सेलला लागली भीषण आग |
Chandrapur Fire: आज चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरात असलेले A To Z बाजार सेलला सकाळी ७ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. हे ठिकाण नेमके ताडोबा जाणाऱ्या मार्गावर आहे. या ठिकाणी जवळच लागून हॉटेल रेस्टारंट आणि बियर शॉपी पण आहे. या आगीत A To Z बाजार पूर्णपणे जळून खाक झाले असून यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आणि सर्व सुरक्षित असल्याचे अशी माहिती तिथल्या परिसरात असलेल्या नागरिकांकडून मिळाली.
Chandrapur Fire: चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरात भीषण आग
आग विझवण्यासाठी ४ अग्निशामक गाड्यांना बोलावले होते. अग्निशामक दलाच्या जवानाने आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परंतु आग हि प्रचंड प्रमाणामध्ये असल्यामुळे त्यांचे हे प्रयत्न व्यर्थ ठरले. आगीने रोद्ररूप धारण केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हि आग शार्टसर्किटमुळे लागली असावी हा अंदाज वर्तविला जात आहे.
हा दृश्य बघण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढलेली होती. त्यादरम्यान घटनास्थळी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन उपस्थित होते. आणि गर्दीला घटनास्थळावरून हटविण्यासाठी पोलिसांचा मोठा फोर्स तैनात केला गेला होता.
